Tuesday, December 05, 2006
पाउस कोसळतोय
पाऊस कोसळतोय
जा ! भिजुन घे...
बुध्दिला पटत नाहि म्हणतोस
मग खिडकित उभं राहुन बघ..
काय झालं !
तो खुणावतोय
तो वेडावतोय
मग जा कि,
नेहमीच जगतो चौकटीत
जरा तोडुन बघ कधीतरी
काय होइल !
लोक हसतील,
हसु देत
आजारी पड्शील ,
पडु दे
कॉलेज / ऑफ़िस बुडेल ,
बुडू दे
जा कि
भिजुन घे
अगदि मनापासुन
त्यालाही असतच कि
कधितरी भिजायच
ओल्या ओल्या
पाऊसात चिंब चिंब
व्हायच असत
जुन्या आठवणींमध्ये
रमायच असत
आणि पाऊसासोबत
डोळ्यातुन वाहयच असत
नकळत....अगदि तुझ्याही
मन आहे ते
त्यालाही एक मन असनारच कि...
जा भिजुन घे....
--Tush
Sunday, July 09, 2006
ऋण
ऋण
वेदनांचे देने
संपता संपत नाही
मातीचे ऋण
फ़िटता फ़िटत नाही
अशा वेळि एकांतात
नक्षांत्रांच्या संगतीत
माझे जीवन गाणे
मिळता मिळत नाही.....
-Tush
वेदनांचे देने
संपता संपत नाही
मातीचे ऋण
फ़िटता फ़िटत नाही
अशा वेळि एकांतात
नक्षांत्रांच्या संगतीत
माझे जीवन गाणे
मिळता मिळत नाही.....
-Tush
अजुन एक गोष्ट वेड्या पावसाची
गोष्ट वेड्या पावसाची
गोष्ट वेड्या पावसाची
आकाशातून कोसळणाय्रा सप्तधारांची
गोष्ट वेड्या पावसाची
नभात इन्द्रधनु बांधणाय्रा जलधारांची
गोष्ट वेड्या पावसाची
चोर पावलानी येउन भिजवनाय्रा आठवणींची......
आकाशातून कोसळणाय्रा सप्तधारांची
गोष्ट वेड्या पावसाची
नभात इन्द्रधनु बांधणाय्रा जलधारांची
गोष्ट वेड्या पावसाची
चोर पावलानी येउन भिजवनाय्रा आठवणींची......
-Tush
Saturday, July 08, 2006
Subscribe to:
Posts (Atom)