Thursday, August 21, 2008


क्षणच ते...

क्षणसाधाया हसरे होतो आपण

मन मात्र पळत राहत

जुन्याच आठवणीत

खोल उरी दडलेल काहीस..


सगळी संध्याकाळच

फ़ेर धरुन् येते...

मनाच्या आठवणीत मग तिही जाउन बसते
आपण खेळत राहतो खेळ

जुने चित्र , नवे चित्र

ह्यात नक्की काय जुळते

काय हरवते तेच कळेनासे होईपर्यंत

Wednesday, August 22, 2007

हे असे का व्हावे??!!!




एक नात तुटत

तेंव्हा नक्कि काय होत?!

काळजात कुठेतरी खुपत

वरुन कितीही दाखवल ना

तरी मन कुठेतरी रडत

अचानक आकाश भरुन याव एखादेवेळी

अन् पाऊस पडूच नये

नुसतच आभाळ भरुन राहव

आणि मधूनच वीज चमकत राहावी

तशीच आठवन येऊन जाते

वेळ कातर होत राहते

जखम जुनीच असते

नुकतीच कुठे खपली धरु लागलेली

पुन्हा नव्याने भळभळू लागते

चुक कोणाची असते

किंवा असते की नसते

ह्याला आता फ़ारसा अर्थ नसतो

अन् हे सगळ आठवून

हताशपणे बघण्यापलिकडे

काहिच उरलेल नसत....

हे अस का व्ह्याव!!!.....

--तुष

१९-०८-२००७

Sunday, July 15, 2007

चार ओळिंचा हा प्रश्न नाही
हे तर जीवन मरणाचे अंतर
अस्तित्त्वाच्या ढगाला
मृत्युचे सोनेरी रिंगण
--Tush

Tuesday, June 12, 2007

आठवणीची सुरुवात नक्कि कुठुन होते........वर वर कितीतरी सोप्पा वाटला तरि ह्याच उत्तर सहज देता येत नाही...चक्रवायला होत नाही क??!आठवणींचहि तसच काहितरि असत..कुठून सुरु होतील आणि कुठे संपतील काहिच सांगता येत नाहि.आणि त्यातच खरि गंमत लपलेलि असते नाहि का!!....बर आठवणी एखाद्या कुपित बन्द करुन पण ठेवता येत नाहि. तुम्ही कितिहि टाळल तरि त्या तुम्हाला कधी ना कधी बरोबर त्यांच्या सोबत घेउन जातात..बऱ्याचदा मन मोथ्या आनन्दाने जाते येतान मात्र पाउल अडत आणि अश्रु बान्ध सोडुन पळतातकितिहि अदवल , लपवल तरि उरि दातुन येतच ना!!!....
--Tush

Friday, May 25, 2007

आयुष्य असच जगायच असत् ग्!!!!


कधी कधी आठवणींसोबत

जगायच असत...

छोट्या छोट्या गोष्टिंत

मन रमायच असत...नाहीच जमल काहि तर

रुसायच असत स्वत:वरच...

आणि मग् स्वत:लाच

मनवायच असत...

मनाच्या सोबत लांब लांब

जायच असत...गुपचुप

पक्षि का गातात?

पाऊस का पडतो?

तुझ-माझ का जमत ?

(असे प्रश्न नसतात ग् विचारायचे..)

अळवाच्या पाऊसाला

त्याच् आणि धरतीच

नात नसत ग विचारायच...

आयुष्य मनसोक्त जगायच असत

जस कोसळनाऱ्या पाऊसासारख...

किंवा खळाळणाऱ्या झऱ्यासारख

आईसक्रिम वितळण्याआधी

संपवायच असत ग...

आयुष्य असच जगायच असत् ग्!!!!

--Tush

Thursday, May 24, 2007

अंधारलेल प्रेम

आज काहीतरी घडलय एवढ नक्कि
नाहीतर आजचा अंधार एवढा गडद नसता
रोजच मला सोबत करणारी वटवाघळ
एवढी परक्यासारखी नसती वागली
आज त्यांच काहीतरी बिनसलेल दिसतय
नाहीतर रोज मी दिसताच
मला कवटाळनारा अंधार असा अलिप्त
नसता राहीला...
आज ती नाही म्हणुन
माझ अस्तित्वच जणू
गहिरलेल....अगदी काळोखासारख...
--Tush

नौयदा हत्याकांड...

माणुस् म्हणुन् माझा जन्म व्यर्थ आहे
ज्या देशाला हजारो वर्षांची संस्कृती आहे
ज्या देशात महात्मा झाले
त्या मातीचा मी पुत्र असण
शक्य नाही
एव्हढ सगळ होऊनही जर
माझा रक्त उसळत नसेल
तर् खरच् माझा जन्म व्यर्थ आहे...
त्या चिमुकल्याच्या आरोळ्या एकु येत् असुनही
जर मी सुखात झोपत असेन् तर
माझ जिवंत असण लाजिरवाण आहे...
आणि माझा आवाज एकुन ही
ज्यांना आपल्या घरात
निवांत पणा लाभत असेन
त्यांना माणुस म्हणन हा माणसाचाच अपमान आहे
--Tush
पाउस आज पडुन गेला
दोन आसव गाळुन गेला
जाता जात माझ्या खांद्यावर
एक ओझ देउन गेला.....
--Tush