Monday, December 04, 2006

पाउस कोसळतोय



पाऊस कोसळतोय
जा ! भिजुन घे...
बुध्दिला पटत नाहि म्हणतोस
मग खिडकित उभं राहुन बघ..
काय झालं !
तो खुणावतोय
तो वेडावतोय
मग जा कि,
नेहमीच जगतो चौकटीत
जरा तोडुन बघ कधीतरी
काय होइल !
लोक हसतील,
हसु देत
आजारी पड्शील ,
पडु दे
कॉलेज / ऑफ़िस बुडेल ,
बुडू दे
जा कि
भिजुन घे
अगदि मनापासुन
त्यालाही असतच कि
कधितरी भिजायच
ओल्या ओल्या
पाऊसात चिंब चिंब
व्हायच असत
जुन्या आठवणींमध्ये
रमायच असत
आणि पाऊसासोबत
डोळ्यातुन वाहयच असत
नकळत....अगदि तुझ्याही
मन आहे ते
त्यालाही एक मन असनारच कि...
जा भिजुन घे....
--Tush


एकदा तळहात बघ तर खर..
माझ्या विश्वासाच फ़ुलपाखरु केंव्हाच बसलय..
स्वप्नांचे सौदागर बगळे
त्यांच्या चोचीत आपल्या मैत्रीची स्वप्ने घेउन आलेत..
बघ जमलच तर माझ्या नजरेने त्यांच्याकडे
तिथे तुला फ़क्त आपल्या मैत्रीची वाट दिसेल..
मी म्हणत नाहि कि ति फ़ुलंची असेल
त्यात काटे पण असतील थोडे...
तुला चालतील ना!!
-Tush