
माझा बाप
मला रोज़ भेटायचा
कधी स्वप्नातुन
कधी प्रत्यक्षात...न् चुकता...
त्याची वारि कधी चुकली नाही...
आम्ही मात्र
शिकत राहिलो चुकत् माकत..
जानाऱ्या प्रत्येक प्रसंगातुन
तो आम्हाला नव्याने ऊलगडत राहिला
आणि सोबत नव्याने जग दाखवत राहिला
कितिदा तरि आम्हि चिड्-चिड् चिड्लो...
पण त्याचा संयम् कधी सुटला नाही...
निदान् आमच्यासमोर तरी नाही...
आम्ही पाहिलाय त्याला झिजताना आमच्यासाठी....कणाकणाने..
अन् मरताना आम्हाला वेळ देता येत नाही म्हणुन....
त्यानेच आम्हाला शिकवल शुन्याच्या पलिकडे पाहीला...
आणि दाखवल शुन्यालाहि किंमत असते म्हणुन...
त्यानेच शिकवल ताठ मानेने जगयाला...
स्व:ताच स्वत्व जपायला....
या काटेरि जगातले फ़ुल वेचायला...
त्यांचा भर् भरुन आनंद घ्यायला
आणि वाटयलाहि.....
मनसोक्त् जगन काय असत हे त्यानेच दाखवल...
माझ्यातल्या "मि"ला ओळखण्याच न् जोपासन्याच
सामर्थ्य मला त्यानेच दिल...
स्वांतत्र्यासोबत जबाबदारी येते
हे त्यानेच दाखवल...
विश्वास टाकन सोप्प असत
आणि त्याहुन सोप्प असत ते तोडण...
अवघड असत ते जपण....
---Tush
