Friday, May 25, 2007

आयुष्य असच जगायच असत् ग्!!!!


कधी कधी आठवणींसोबत

जगायच असत...

छोट्या छोट्या गोष्टिंत

मन रमायच असत...नाहीच जमल काहि तर

रुसायच असत स्वत:वरच...

आणि मग् स्वत:लाच

मनवायच असत...

मनाच्या सोबत लांब लांब

जायच असत...गुपचुप

पक्षि का गातात?

पाऊस का पडतो?

तुझ-माझ का जमत ?

(असे प्रश्न नसतात ग् विचारायचे..)

अळवाच्या पाऊसाला

त्याच् आणि धरतीच

नात नसत ग विचारायच...

आयुष्य मनसोक्त जगायच असत

जस कोसळनाऱ्या पाऊसासारख...

किंवा खळाळणाऱ्या झऱ्यासारख

आईसक्रिम वितळण्याआधी

संपवायच असत ग...

आयुष्य असच जगायच असत् ग्!!!!

--Tush

Thursday, May 24, 2007

अंधारलेल प्रेम

आज काहीतरी घडलय एवढ नक्कि
नाहीतर आजचा अंधार एवढा गडद नसता
रोजच मला सोबत करणारी वटवाघळ
एवढी परक्यासारखी नसती वागली
आज त्यांच काहीतरी बिनसलेल दिसतय
नाहीतर रोज मी दिसताच
मला कवटाळनारा अंधार असा अलिप्त
नसता राहीला...
आज ती नाही म्हणुन
माझ अस्तित्वच जणू
गहिरलेल....अगदी काळोखासारख...
--Tush

नौयदा हत्याकांड...

माणुस् म्हणुन् माझा जन्म व्यर्थ आहे
ज्या देशाला हजारो वर्षांची संस्कृती आहे
ज्या देशात महात्मा झाले
त्या मातीचा मी पुत्र असण
शक्य नाही
एव्हढ सगळ होऊनही जर
माझा रक्त उसळत नसेल
तर् खरच् माझा जन्म व्यर्थ आहे...
त्या चिमुकल्याच्या आरोळ्या एकु येत् असुनही
जर मी सुखात झोपत असेन् तर
माझ जिवंत असण लाजिरवाण आहे...
आणि माझा आवाज एकुन ही
ज्यांना आपल्या घरात
निवांत पणा लाभत असेन
त्यांना माणुस म्हणन हा माणसाचाच अपमान आहे
--Tush
पाउस आज पडुन गेला
दोन आसव गाळुन गेला
जाता जात माझ्या खांद्यावर
एक ओझ देउन गेला.....
--Tush