हे असे का व्हावे??!!!
एक नात तुटत
तेंव्हा नक्कि काय होत?!
काळजात कुठेतरी खुपत
वरुन कितीही दाखवल ना
तरी मन कुठेतरी रडत
अचानक आकाश भरुन याव एखादेवेळी
अन् पाऊस पडूच नये
नुसतच आभाळ भरुन राहव
आणि मधूनच वीज चमकत राहावी
तशीच आठवन येऊन जाते
वेळ कातर होत राहते
जखम जुनीच असते
नुकतीच कुठे खपली धरु लागलेली
पुन्हा नव्याने भळभळू लागते
चुक कोणाची असते
किंवा असते की नसते
ह्याला आता फ़ारसा अर्थ नसतो
अन् हे सगळ आठवून
हताशपणे बघण्यापलिकडे
काहिच उरलेल नसत....
हे अस का व्ह्याव!!!.....
--तुष
१९-०८-२००७

3 comments:
Your blog is nice. I think you should add your blog at BlogAdda and let more people discover your blog. It's a great place for Indian bloggers to be in and I am sure it would do wonders for your blog.
really nice words as usual .. khup chan aahe tujha blog specially te butterfly pic.
Post a Comment