Wednesday, August 22, 2007

हे असे का व्हावे??!!!




एक नात तुटत

तेंव्हा नक्कि काय होत?!

काळजात कुठेतरी खुपत

वरुन कितीही दाखवल ना

तरी मन कुठेतरी रडत

अचानक आकाश भरुन याव एखादेवेळी

अन् पाऊस पडूच नये

नुसतच आभाळ भरुन राहव

आणि मधूनच वीज चमकत राहावी

तशीच आठवन येऊन जाते

वेळ कातर होत राहते

जखम जुनीच असते

नुकतीच कुठे खपली धरु लागलेली

पुन्हा नव्याने भळभळू लागते

चुक कोणाची असते

किंवा असते की नसते

ह्याला आता फ़ारसा अर्थ नसतो

अन् हे सगळ आठवून

हताशपणे बघण्यापलिकडे

काहिच उरलेल नसत....

हे अस का व्ह्याव!!!.....

--तुष

१९-०८-२००७

Sunday, July 15, 2007

चार ओळिंचा हा प्रश्न नाही
हे तर जीवन मरणाचे अंतर
अस्तित्त्वाच्या ढगाला
मृत्युचे सोनेरी रिंगण
--Tush

Tuesday, June 12, 2007

आठवणीची सुरुवात नक्कि कुठुन होते........वर वर कितीतरी सोप्पा वाटला तरि ह्याच उत्तर सहज देता येत नाही...चक्रवायला होत नाही क??!आठवणींचहि तसच काहितरि असत..कुठून सुरु होतील आणि कुठे संपतील काहिच सांगता येत नाहि.आणि त्यातच खरि गंमत लपलेलि असते नाहि का!!....बर आठवणी एखाद्या कुपित बन्द करुन पण ठेवता येत नाहि. तुम्ही कितिहि टाळल तरि त्या तुम्हाला कधी ना कधी बरोबर त्यांच्या सोबत घेउन जातात..बऱ्याचदा मन मोथ्या आनन्दाने जाते येतान मात्र पाउल अडत आणि अश्रु बान्ध सोडुन पळतातकितिहि अदवल , लपवल तरि उरि दातुन येतच ना!!!....
--Tush

Friday, May 25, 2007

आयुष्य असच जगायच असत् ग्!!!!


कधी कधी आठवणींसोबत

जगायच असत...

छोट्या छोट्या गोष्टिंत

मन रमायच असत...नाहीच जमल काहि तर

रुसायच असत स्वत:वरच...

आणि मग् स्वत:लाच

मनवायच असत...

मनाच्या सोबत लांब लांब

जायच असत...गुपचुप

पक्षि का गातात?

पाऊस का पडतो?

तुझ-माझ का जमत ?

(असे प्रश्न नसतात ग् विचारायचे..)

अळवाच्या पाऊसाला

त्याच् आणि धरतीच

नात नसत ग विचारायच...

आयुष्य मनसोक्त जगायच असत

जस कोसळनाऱ्या पाऊसासारख...

किंवा खळाळणाऱ्या झऱ्यासारख

आईसक्रिम वितळण्याआधी

संपवायच असत ग...

आयुष्य असच जगायच असत् ग्!!!!

--Tush

Thursday, May 24, 2007

अंधारलेल प्रेम

आज काहीतरी घडलय एवढ नक्कि
नाहीतर आजचा अंधार एवढा गडद नसता
रोजच मला सोबत करणारी वटवाघळ
एवढी परक्यासारखी नसती वागली
आज त्यांच काहीतरी बिनसलेल दिसतय
नाहीतर रोज मी दिसताच
मला कवटाळनारा अंधार असा अलिप्त
नसता राहीला...
आज ती नाही म्हणुन
माझ अस्तित्वच जणू
गहिरलेल....अगदी काळोखासारख...
--Tush

नौयदा हत्याकांड...

माणुस् म्हणुन् माझा जन्म व्यर्थ आहे
ज्या देशाला हजारो वर्षांची संस्कृती आहे
ज्या देशात महात्मा झाले
त्या मातीचा मी पुत्र असण
शक्य नाही
एव्हढ सगळ होऊनही जर
माझा रक्त उसळत नसेल
तर् खरच् माझा जन्म व्यर्थ आहे...
त्या चिमुकल्याच्या आरोळ्या एकु येत् असुनही
जर मी सुखात झोपत असेन् तर
माझ जिवंत असण लाजिरवाण आहे...
आणि माझा आवाज एकुन ही
ज्यांना आपल्या घरात
निवांत पणा लाभत असेन
त्यांना माणुस म्हणन हा माणसाचाच अपमान आहे
--Tush
पाउस आज पडुन गेला
दोन आसव गाळुन गेला
जाता जात माझ्या खांद्यावर
एक ओझ देउन गेला.....
--Tush

Wednesday, April 18, 2007

माझ्याकडण बोलल जात नाही
आणि तुही काही कळु देत नाहीस
आता सांग मी कराव तरी काय
मनातल ओठावर आणाव की डोळ्यात
--Tush

Thursday, March 08, 2007

एक वेध क्षितिजाचा
दुर नेणाऱ्या वाटांचा
एक वेध मनाचा
रुसव्या-फ़ुगव्यात रमणाऱ्य २ जिवांचा

Friday, February 09, 2007

दूर-दूर
तो सागरी किनारा
गर्जतो मनात
वादळ वारा

---Tush

Friday, February 02, 2007

सामान्यातुनच असामान्यत्व येत ना!!
तसच काहिस असत प्रयत्नाच
माहिती आहे कि हार निश्चित आहे
पण काय हरकत आहे एक प्रयत्न करयला
---Tush


रोज़ आम्ही विचारांवर झुलायचे
आणि रोज़ विचारंशीच झगडायचे
तुच सांग आता आम्ही कसे जगायचे
रडत रडत कि लढत लढत
--Tush


प्रत्येक गोष्ट काय परिची नसते
आणि प्रत्येकाची कहानी काही सारखी नसते
तुटलेलच सही पण प्रेमाचे चार तुकडे तर आहेत ना!
दु:ख तर आहेच
पण त्याना सावरनार्‍या आठवणी पण तर आहे ना!
--Tush


ही जमिन ही माझीच
आणि हे आकाश पण
वाट बघतोय पंखांची
ऊंचच ऊंच उडन्यासाठी
--Tush


पड्न्याचि भीति नाहिये...
ना उडन्याचि
भीति आहे ती
बान्धलेले घरटे तोडण्याचि
एक डाव उधळ्ण्याची
--Tush



वारा झॊंबु लागला की
तुझी आठवण येते...
किती वेळा सांगितल मी त्याला
सगळ केव्हाच संपलय म्हणून...
पण काही केल्या या आठवनी
पाठ सोडत् नाहित्.....
आणि संपलेल्या जिवनाला
नव्याने जगायचि ओढ लावायला काहि चुकत् नाहित्
--Tush


जीवन म्हणजेच झिजण नव्हे का?
तुझ माझ्यासाठी आणि माझ् तुझ्यासाठी
अगदि एकमेकांच्या नकळत
आणि न कुरकुरता....
खरय...
नको असलेली नाती जन्मभर सोबत राहतात....
पण त्याना अबोल बन्धांची सर काही येत नाही...
कोणत्या तरी एका क्षणाला
आठवत ते त्यांच हक्काने आपल असण...
शब्दांपेक्शा अबोल्यानेच ते काम केलेल असत...
---Tush


शब्दानंचा खेळ खेळता येत नाहि म्हणतेस
आणि ह्र्दयाचा खेळ अचुक खेळतेस.....
मनात् असेल ते डोळ्यात दिसत अस म्हणतात...
तस नसत तर तु कस माझ मन जाणल असतस...
--Tush


माहित असत कि तु येनार् नाहिस
पण मन काहि एकत नाही...
समोर नसलेल्या पारावर बिच्चार रोज़ जाउन बसत
मग् मीही म्हणतो जाऊद्या कशाला त्याच मन मोडयच...
--Tush


कधी कधी आठवणींसोबत
जगायच असत...
छोट्या छोट्या गोष्टिंत
मन रमायच असत...
--Tush

Friday, January 26, 2007

माझा बाप



माझा बाप
मला रोज़ भेटायचा
कधी स्वप्नातुन
कधी प्रत्यक्षात...न् चुकता...
त्याची वारि कधी चुकली नाही...
आम्ही मात्र
शिकत राहिलो चुकत् माकत..
जानाऱ्या प्रत्येक प्रसंगातुन
तो आम्हाला नव्याने ऊलगडत राहिला
आणि सोबत नव्याने जग दाखवत राहिला
कितिदा तरि आम्हि चिड्-चिड् चिड्लो...
पण त्याचा संयम् कधी सुटला नाही...
निदान् आमच्यासमोर तरी नाही...
आम्ही पाहिलाय त्याला झिजताना आमच्यासाठी....कणाकणाने..
अन् मरताना आम्हाला वेळ देता येत नाही म्हणुन....
त्यानेच आम्हाला शिकवल शुन्याच्या पलिकडे पाहीला...
आणि दाखवल शुन्यालाहि किंमत असते म्हणुन...
त्यानेच शिकवल ताठ मानेने जगयाला...
स्व:ताच स्वत्व जपायला....
या काटेरि जगातले फ़ुल वेचायला...
त्यांचा भर् भरुन आनंद घ्यायला
आणि वाटयलाहि.....
मनसोक्त् जगन काय असत हे त्यानेच दाखवल...
माझ्यातल्या "मि"ला ओळखण्याच न् जोपासन्याच
सामर्थ्य मला त्यानेच दिल...
स्वांतत्र्यासोबत जबाबदारी येते
हे त्यानेच दाखवल...
विश्वास टाकन सोप्प असत
आणि त्याहुन सोप्प असत ते तोडण...
अवघड असत ते जपण....
---Tush

Monday, January 22, 2007


अस नाही करायच बघ
छोट्याशा आयुष्यात
अशा मोठ्या गोष्टि होतच असतात
त्या साठी अस मन नाही मोडायच बघ
ऎखादि गोष्ट विसरु विसरु
म्हणता तिलाच आठवायच असत
शब्दांच्या ह्या कोटीत अस अडकायच नसत
मनाला चिमटित पकडायच नसत
एक माझ जरा ,
शब्दांना ओठी रोकायच नसत
पाझरु दे कि त्यांना
उडुदे म्रुदगंध.....तुझ्या मनातल्या भावनांचा
ओठी दडलेल्या सप्त-सुरांचा
--Tush

Sunday, January 21, 2007

खर तर ३१ हा दिवसच मजेशीर असतो. डिसें. सुरु होताच आपण ३१ तारखेची वाट पाहत असतो, अगदि उत्कटतेने...डोक्यात काय काय प्लॅन शिजत असतात हे ज्याच त्यालाच माहिति असत.... रोज़ आपण सग्ल्यामित्रांना फोन कर्तो आनि मग सुरु होतात ते नव नविन कल्पना ३१ तारिख साजरी करण्यासाठि.मग कोण सांगत कि छान पैकी पार्टि ठेवुया ,कोण म्हणत कि मस्त पैकी डान्स पार्टि ठेवुया , कोण म्हणत कि आपण कॅम्पफ़ायर करुया ,मध्येच कोणितरि टूम काढत लॉन्ग ड्राइव्ह वर जायची, किंवा कोणी हौशि म्हणतो कि जाउया छान पैकि हरिश्चंन्द्र गडावर नव्या वर्षाची सुरुवात करुया तिथला सुर्योदय बघत.......... अशा कितितरी कल्पना येतात आणि निघुन जातात. अस करता करता ३१ उजाडतो आणि बरचसे प्लॅन फ़िस्कटलेले असतात आणि मंडली पण .....आणि मग जमतात ते न गळालेले मित्र आणि मंडळी आणि जातात कुठेतरी आणि छान पैकि जेवता जेवता उजाळा मिळत जातो जुन्या आठवणिंना... कितीतरी प्रसंग जातात डोळ्यांसमोरुन अगदि काल घड्ल्यासारखे...खर सांगायच तर हि ३१ तारिख मुळातच जाते ति मोथ्या मिश्र मन:स्थितित एकिकडे १ वर्श सरत असत आणि दुसरिकदे नव वर्श समोर येउन उभ असत. बऱ्याचदा जल्लोशात नाहि लक्षात येत.
अशातच १ जाने. उजाडतो सोबत रात्रिचा हॅन्गओव्हर घेउन. सकाळ (खरतर दुपार) होते ती चहा किंवा कॉफ़ीने मग हळुहळु जाणवत एक वर्ष सरल्याच. तस म्हटल तर १ वर्षाला काळाच्या ओघात एक ठिपक्याचही स्थान नसाव पण आप्ल्यासाठी तेच वर्ष खुप काहि घेउन आलेल असत..आपल्याला कितितरी अनुभवांनी सम्रुद्ध केलेल असत अगदि आप्ल्या नकळत.त्यात भरपुर दुःखाचे क्षण असतील कदाचित पण काहि सुखाचे ही असतात की...सरल्या वर्षाची गोळाबेरिज तशी संपुर्णपणे कधी करताच येत नाहि. मग आपण शोधु लागतो ते काय कमावल आणि काय गमावल .... आणि हे करता करता आपण करु लागतो ते नव नविन "संकल्प".नव्या वर्षी होणाऱ्या संकल्पांची मजा काहि ओरच असते..बरचसे संकल्प ठरतात ते तोड्ण्यासाठी किंवा सोडण्यासाठी...काहिजण नविइन डायरि घेतात रोजनिशी लिहिण्यासाठी, त्यात पन पहिले काहि दिवस सोदले तर बाकि पाने कोरिच असतात.सगळच कस मजेशीर असत नाही! ३१ डिसें. आणि १ जाने. ह्यांना अनन्यसाधारन महत्व आहे ते ह्यामुळेच कदचित निदान तरुणाईत तरि. तरुणाई म्हणजे वयाने नाहि तर ह्रुदयाने !!!!

"आम्हि जातो आमच्या गावा
आमचा राम राम घ्यावा"

सरत्या वर्षाला शेवटी आपण मोठ्या मनाने निरोप देतो.डोळ्याच्या कडा ओलवतात ,कितिहि दःख ,वेदना जरि ह्या वर्षात आपल्या वाटेला आलेलि असली तरि . कुठेतरी जाणवत ते त्याच आपल्यातुन जान. अगदि रोज़ तारिख लिहायचि सवय ही त्याचिच जाणिव करुन देते.पण तेवढ्यात पटकन जाणिव होते ते नविन वर्ष समोर येउन ठेप्ल्याची मग आपण त्याच स्वागत करतो डोळ्यांच्या कद तशाच ओल्या ठेवुन पण त्या असतात प्रेमाने ओथंबलेल्या आनदांने भरलेल्या...आणि कुथेतरि थोडिशी त्रुप्ति आणि थोद्या अपेक्षा..... आणि ओंठावर एक छानस हसु.....--Tush